Vidhan Bhavan clash : विधानभवन राडा प्रकरणी सर्जेराव टकले, नितीन देशमुख यांना जामीन मंजूर
(Vidhan Bhavan clash ) विधानभवनाच्या लॉबीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या याप्रकरणी सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांना हाणामारी प्रकरणी गुरुवारी रात्री दोघांना अटक करण्यात आली होती.
आता या नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबईच्या किल्ला कोर्टाने नितीन देशमुख ( जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता ) आणि सर्जेराव टकले ( गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता ) या दोघांना 25 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सोमवारी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावताच दोघांनीही जामीनासाठी अर्ज केला होता.