Vidhan Parishad Election Result : कोणाला किती मते? येथे पाहा

Vidhan Parishad Election Result : कोणाला किती मते? येथे पाहा

विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच हाती आले असून महाविकास आघाडी पाच तर भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच हाती आले असून महाविकास आघाडी पाच तर भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसचा एका उमेदवाराचा पराभव झाला आहे.

भाजपचे एकून पाच उमेदवार विजयी झाले आहेत. यात उमेदवार प्रवीण दरेकर 26, राम शिंदे 26, श्रीकांत भारती 26, उमा खापरे 26 व प्रसाद लाड 26 मतांनी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे प्रसाद लाड यांना विजयी होण्यासाठी मते कमी पडत होती. परंतु, देवेंद्र फडणवीसांचा चमत्कार पुन्हा एकदा दिसला असून 20 मते फोडण्यात त्यांना यश आले आहे. यामुळे प्रसाद लाड कॉंग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांचा पराभव करत 26 मतांनी विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांना 27 मते मिळाली आहेत. तर रामराजे निंबाळकर यांचे एक मत बाद होऊनही 26 मतांनी विजयी झाले आहेत. तर, शिवसेना उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे 26 मतांनी विजयी झाले आहेत.

कॉंग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा 26 मतांनी विजयी झाला असून भाई जगताप यांचा मात्र पराभव झाला आहे. त्यांना 20 मते मिळाली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com