Vijay Wadettiwar : भारतीय जनता पक्ष एक नंबरवर राहील, कारण...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Vijay Wadettiwar ) राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल येणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मते मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. या निकालाच्या आधी राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, "मी असं म्हणणार नाही की काँग्रेस पार्टी एक नंबरवर राहिल. तुम्ही सर्व या निकालानंतर चकीत व्हाल. काँग्रेस पार्टीला या राज्यामध्ये क्रमांक 2वर आपण सगळं बघू शकाल. आजचा निकाल विदर्भातील सर्वाधिक नगरपरिषदा या काँग्रेसच्या ताब्यात दिसतील."
" महाराष्ट्रामध्ये प्रचंड पैशांचा पूर आणला गेला, सत्तेचा दुरुपयोग केला गेला. त्यामुळे भाजप निवडणूक आयोगाच्या सहकार्याने 1 नंबरवर राहिलं. परंतु जनतेच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या सहकार्याने जनतेच्या मनामध्ये काँग्रेस आहे आणि राहिल. भारतीय जनता पक्ष एक नंबरवर राहील." असे विजय वडेट्टीवार म्हणाले .
Summery
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल
विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
"जनतेच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या सहकार्याने जनतेच्या मनामध्ये काँग्रेस"
