Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; कारण काय?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Vijay Wadettiwar ) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पुणे जमीन प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हे पत्र लिहिले आहे. पुणे मुंढवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
या जमीन प्रकरणी नेमलेल्या चौकशी समिती मधील अधिकारी सुद्धा त्या प्रकरणात सहभागी, त्यामुळे ही समिती रद्द करावी असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी असून या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
Summery
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
पुणे मुंढवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
'या जमीन प्रकरणी नेमलेल्या चौकशी समिती मधील अधिकारी सुद्धा त्या प्रकरणात सहभागी'
