विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी; आजपासून देवाचे 24 तास दर्शन

विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी; आजपासून देवाचे 24 तास दर्शन

कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबरला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबरला आहे. या निमित्त लाखो भाविक पंढरपूरला येतात. यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे.

मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडे राहणार असल्याने रांगेत उभं राहण्याचा कालावधी कमी होणार आहे. 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे. आज सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास देवाच्या पोशाख आणि शेजारतीनंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात येतो.

1 डिसेंबर पासून विठ्ठलाची प्रत्यक्ष पूजा होणार असून त्या दिवसांपासून पुन्हा देवाचे नित्योपचार सुरू होणार. अशी प्रथा सांगितली जाते की, देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो यामुळे देवाची झोप बंद होते. यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com