Sandeep Deshpande
Sandeep Deshpande

Sandeep Deshpande : महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, संदीप देशपांडे ट्विट करत म्हणाले...

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sandeep Deshpande) राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. उद्या 16 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे.

या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यातच आता संदीप देशपांडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. संदीप देशपांडे यांनी ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, या वेळी फक्त ठाकरेच. आपल्या मायमराठीवर संक्रांत येऊ देऊ नका. गोड गोड बोलण्यासाठी तिळगूळ बरा पण यावेळी मतदान 'मराठी'साठीच करा. असे संदीप देशपांडे ट्विट करत म्हणाले.

Summary

  • राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान

  • "या वेळी फक्त ठाकरेच"

  • "आपल्या मायमराठीवर संक्रांत येऊ देऊ नका"

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com