मातीच्या घराची भिंत कोसळली.. ५ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

मातीच्या घराची भिंत कोसळली.. ५ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

Published by :
Published on

मातीच्या घराची भिंत कोसळल्याने नाशिकमध्ये ५ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. तर घरातील इतर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील सावकी या गावात घडली आहे. पावसामुळे घराच्या मातीची भिंत कोसळल्याने हा प्रकार घडला. नाशिकच्या देवळा तालुक्यातील सावकी या गावात आदिवासी वस्तीत पठाण कचरू सोनवणे व त्यांचे कुटूंब मातीचे घरात राहत होते. सोनवणे कुटुंबीय झोपेत असतांनाच मध्यरात्री झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे घराची भिंत अचानक कोसळली.

या भिंतीखाली पती – पत्नीसह दोन मुलं सापडले. भिंत कोसळल्याच्या आवाज ऐकल्यानंतर शेजारी मदतीला धावले असता त्यांनी या कुटुंबियांना बाहेर काढले. गंभीर अवस्थेत असलेल्या पठाण सोनवणे त्यांची पत्नी सुनीता, मुलगा आकाश व कुणाल हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यावेळी पाच वर्षीय आकाश याचा रस्त्यातच मृत्यू झाला. तर उर्वरित सोनवणे कुटुंबियांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे..या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com