Rain Update : सोनोरा गावात 150 घरात पुराचे शिरले पाणी; सुरक्षित ठिकाणी नागरिकांना हलविले

Rain Update : सोनोरा गावात 150 घरात पुराचे शिरले पाणी; सुरक्षित ठिकाणी नागरिकांना हलविले

वर्ध्यातील सोनोरा (ढोक) गावात पुराचे पाणी शिरल्याने 150 च्या जवळपास कुटुंब इतरत्र स्थलांतर करण्यात आले आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade

भूपेश बारंगे | वर्धा : वर्ध्यातील सोनोरा (ढोक) गावात पुराचे पाणी शिरल्याने 150 च्या जवळपास कुटुंब इतरत्र स्थलांतर करण्यात आले आहे. सोनोरा (ढोक) गावाची घरसंख्या 480 ,लोकसंख्या दोन हजार तर जनावरांची संख्या पंधराशे जवळपास आहे. रविवारपासून सूरू असलेल्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाली आहे. जवळपास 150 घरात पुराचे पाणी शिरले आहे.यामुळे घरातील नागरिकांना इतरत्र हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Rain Update : सोनोरा गावात 150 घरात पुराचे शिरले पाणी; सुरक्षित ठिकाणी नागरिकांना हलविले
Madhya Pradesh Bus Accident : इंदूरहून जळगावकडे येणारी बस नर्मदा नदीत कोसळली; 15 जणांचा मृत्यू

गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक घराचे भिंती कोसळल्या आहे.तर घराची पडझड झाली आहे. गावातील लेंडी नाला व लाडकी नदीला पूर आल्याने अनेक घरांना पुराणे विळख्यात घेतले, पहाटे दोन वाजताच्या सुमारास लोकांना स्वतःचे घर सोडावे लागले.पुराचे पाणी वाढत असल्याने गावाशी संपर्क तुटला. पहाटे पासून लोकांना उंचावरील घरात स्थलांतर करावे लागत आहे.सध्या पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांत भीती वातावरण पसरले आहे. गावकऱ्यांना वारंवार पावसाचा फटका बसत असल्याने संपूर्ण गाव पुनर्वसन करण्यात यावी अशी मागणी पूरग्रस्त करत आहे.सध्या गावात तलाठी ,ग्रामसेवक,सरपंच ,उपसरपंच उपस्थित असून नागरिकांची सुविधा केली जात आहे.त्यांना सुरक्षित स्थळी पोहचवण्याचे काम सध्या सुरू असल्याचे उपसरपंच आकाश बोनंदाडे यांनी सांगितले.<iframe width="962" height="541" src="https://www.youtube.com/embed/1Z7pUfe_6Ns" title="Presidential Election 2022:राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देतोय याचा आनंद" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

वर्ध्यात 42 गावाचा संपर्क तुटला

अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पुर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. त्यात वर्धा तालुक्यातील 7, सेलू तालुक्यातील 9, देवळी तालुका 6, हिंगणघाट तालुका 6, समुद्रपूर तालुका 5, आर्वी तालुका 6, कारंजा तालुका 3 आष्टी तालुका निरंक अशा 42 गावांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com