महाराष्ट्र
मानखुर्द येथील मंडाळा परिसरातील गोदामाला आग
राज्यात आगीचे सत्र सुरूच असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे . आज पाहाटे 5 वाजता मानखुर्द येथील मंडाळा परिसरातील गोदामाला आग लागली आहे. या आगीबद्दल माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. ही आग भंगाराच्या गोदामाला लागली आहे. आग विझवण्याचे काम अद्याप सुरुच या आगीतील नुकसानीची अद्याप महिती नाही. ही आग इतकी भीषण होती की आगीच्या मोठ मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट लांब-लांबून दिसत होते.