पंढरपूर; थंडी वाढल्याने विठ्ठल रुक्मिणीला उबदार पोशाख

पंढरपूर; थंडी वाढल्याने विठ्ठल रुक्मिणीला उबदार पोशाख

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीला थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार पोशाख परिधान करण्यात आले आहेत. होळीपर्यंत दररोज उबदार कपडे परिधान केले जातील.
Published by :
shweta walge
Published on

पंढरपूर; राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.‌ थंडीचा कडाका सर्वसामान्यांना जाणवू लागला आहे. तसाच तो देवाला ही जाणवू लागला आहे. थंडीपासून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेचा बचाव व्हावा यासाठी परंपरेनुसार देवाला उबदार कपडे परिधान केले जात आहेत. होळी पर्यंत देवाला दररोज उबदार कपडे परिधान केले जातात.

थंडीचा कडाका सर्वसामान्यांना जाणवू लागला आहे. तसाच तो देवाला ही जाणवू लागला आहे. थंडीचा कडाका बसू नये म्हणून विठू माऊलीच्या मूर्तीला उबदार रझई, शाल व कानपट्टीचा पोशाख परिधान केला जात आहे. कार्तिकी यात्रेच्या प्रक्षाळ पूजेनंतर देवाच्या पोशाखात बदल केला जातो. सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी सुरू आहे. यामुळे अनेकजण थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी उबदार कपड्याचा वापर करत आहेत. त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस थंडी वाजू नये यासाठी मंदिर समितीकडून रजाई, शाल, मफलर व कानपट्टी असा पोशाख परिधान केला आहे.

श्रीविठ्ठल मंदिरात रात्रीच्या वेळी होणारी शेजारती झाल्यानंतर विठ्ठल झोपी जाण्यापूर्वी मूर्तीच्या डोक्याभोवती एका विशिष्ट पद्धतीने 150 हात मुंडासे बांधले जाते. त्यानंतर कानाला थंडी वाजू नये म्हणून उपरण्याची सुती कानपट्टी मूर्तीच्या कानाला बांधण्यात येते. विठ्ठल मूर्तीला डोक्यापासून पायापर्यंत पांढरा शेला परिधान केला जातो. या शेल्यावर उबदार शाल आणि काश्मिरी रजई घातली जाते. विठूरायाच्या मूर्तीला थंडी वाजणार नाही; याची काळजी याद्वारे घेण्यात येते. यानंतर विठ्ठल मूर्तीच्या गळ्यात तुळशीचा हार घातला जातो. मग विठ्ठल मूर्तीची आरती केली जाते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com