Pandharpur
महाराष्ट्र
Pandharpur : अंगावर शाल अन् कानाला कानपट्टी; वाढत्या थंडीमुळे विठ्ठल-रुक्मिणीला उबदार पोशाख
राज्यात थंडीचा कडाका वाढत चालला आहे.
(Pandharpur) राज्यात थंडीचा कडाका वाढत चालला आहे. पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला परंपरेप्रमाणे दररोज शाल पांघरण्यास सुरुवात झाली आहे.
विठ्ठलाच्या मुकुटावर उपरण्याची कानपट्टी आणि अंगावर उबदार रेशमी शाल पांघरण्यात येत आहे. रुक्मिणी मातेसही रेशमी शाल पांघरली गेली असल्याचे पाहायला मिळत आहे.
पहाटे काकड आरती आणि नित्य पूजा झाल्यानंतर उबदार पोशाख घातला जातो. वाढत्या कडाक्याच्या थंडीमध्ये विठ्ठलासही उबदार महावस्त्रे असावेत. यासाठी गेल्या शेकडो वर्षापासून कार्तिकीच्या प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठलास कानपट्टी व अंगावर शाल देण्याची पंढरपुरात परंपरा आहे.
