Washim Rain
महाराष्ट्र
Washim Rain : वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; नदी नाल्यांना पूर, जनजीवन विस्कळीत
गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा पाहायला मिळत आहे.
मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रिसोड-मेहकर महामार्ग पाण्याखाली गेला आहे. महामार्ग पाण्याखाली गेल्याने रस्ता बंद झाला आहे. अनेक नागरिकांना पुलाजवळच थांबण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळत आले.
पहाटेपासून पडत असलेल्या पावसाने वाशिमच्या रिसोड तालुक्यात शेलू खडसे ,वाकद भागात नदी काठच्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी काठच्या राहणाऱ्या अनेकांच्या शेतात पावसाचे पाणी शिरले.