Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण रोडवरील चित्तेगाव परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास 1200 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी वाया गेले.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण रोडवरील चित्तेगाव परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास  1200 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी वाया गेले. ही पाईपलाइन जायकवाडी धरणावरून शहराला पाणी पुरवठा करणारी महत्त्वाची वाहिनी आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाईप फुटल्यानंतर प्रचंड दाबाने पाण्याचे फवारे 100 फूटांपर्यंत हवेत उडताना दिसले.  त्यामुळे पैठण रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि प्रवास करणारे नागरिक अडकून पडले. स्थानिकांनी याबाबत तात्काळ प्रशासनाला माहिती दिली. पाणी टंचाईतही लाखो लिटर पाणी वाया गेले. ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे, कारण मराठवाडा सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. जायकवाडी धरणाची पातळी चिंताजनक आहे. 

महापालिकेच्या जलविभागाने घटनास्थळी धाव घेतली असून, तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून, वाहिनीतील गळती रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र पाईपलाईन फुटीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या घटनेमुळे चित्तेगाव परिसरासह काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com