Malegaon : भर पावसाळ्यात मालेगावात भीषण पाणीटंचाई

Malegaon : भर पावसाळ्यात मालेगावात भीषण पाणीटंचाई

राज्यभरात जोरदार पाऊस सुरु आहे.
Published on

विशाल मोरे, मालेगाव

राज्यभरात जोरदार पाऊस सुरु आहे. यातच राज्यात सर्वत्र पाऊस असताना नाशिकच्या मालेगाववर मात्र भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नाशिकच्या मालेगावात 3 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

नागरिकांना पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा लागणार आहे. चणकापूर व गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणांनी तळ गाठल्याचे पाहायला मिळत आहे.

शिल्लक जलसाठा ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत पुरवण्यासाठी पालिकेने मालेगाव शहरात आज पासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com