महाराष्ट्र
राज्य सरकार नियुक्तीचा आग्रह धरत नाही; राज्यपालांच्या विधानावर अजित पवार म्हणाले…
राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्द्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार आहे, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) पत्रकारांशी बोलत होते.
राज्य सरकार माझ्याकडे 12 सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता?; असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला केला होता. यावर प्रत्युत्तरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. राज्यपालांवर मला बोलण्याचा अधिकार नाही. पण पुढच्या आठवड्यात मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना जाऊन भेटणार आहोत, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.