Mahendra Dalvi : 'डॉन कौन है' जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दाखवून देऊ'; आमदार महेंद्र दळवी यांचा सुनील तटकरे यांना आव्हान
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mahendra Dalvi) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यातच आरोप - प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुरुड महोत्सवात खासदार सुनील तटकरे यांनी 'मैं हुं डॉन' या गाण्यावर केलेल्या डान्सवरून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी जोरदार टीका केली आहे. आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, " रायगड जिल्ह्यात आमची ताकद वाढली आहे. ती एकत्र केली तर 30चा आकडा नक्की पार करू. त्यामुळे कुणी 'मैं हुं डॉन' म्हणत असेल तर त्याला जिल्हा परिषद निवडणुकीनंतर उत्तर देऊ" असं महेंद्र दळवी म्हणाले.
"निवडणूक झाली की तटकरे गियर बदलतात आणि कधी तरी म्हणतात मैं हुं डॉन पण मी सुद्धा त्यांच्यासारखा डॉन आहे, वेळ येईल तेव्हा नक्की दाखवून देऊ" , असा इशाराही आमदार दळवी यांनी दिला.
Summary
'डॉन कौन है' जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दाखवून देऊ'
आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना टोला
सुनील तटकरेंनी केलेल्या डान्सवरून टोलेबाजी
