Nilesh Ghaiwal gang
Nilesh Ghaiwal gang

Nilesh Ghaiwal gang : घायवळ टोळीतील सदस्यांना शस्त्र परवाना; बनावट कागदपत्रांद्वारे परवाना दिल्याची धक्कादायक बाब समोर

निलेश घायवळ प्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nilesh Ghaiwal gang ) निलेश घायवळ प्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता निलेश घायवळ गँग संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली. घायवळ टोळीतील सदस्याला शस्त्र परवाना मिळवून देणाऱ्या एजंटने आणखी 15 पिस्तूल परवाने मिळवून दिले असल्याची माहिती मिळत आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने हा पिस्तूल परवाना मिळवून दिला असून या सर्व परवान्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची पुणे पोलिसांची माहिती दिली आहे. घायवळ टोळीतील सराईत गुन्हेगार अजय सरवदेने 17 सप्टेंबर रोजी कोथरूड परिसरात एका तरुणावर कोयत्याने वार केले होते. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती.

तपासात त्याच्याकडे पिस्तुलाचा परवानाही असल्याचे समोर आले. त्याने पिस्तूल परवान्यासाठी बनावट रहिवासी पुरावा आणि खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केली होती. या एजंट फाटक याने परवाने मिळवून दिलेल्या त्या 15 जणांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या परवान्यांच्या फाईल्स तपासासाठी मागविण्यात आल्या आहेत.

Summery

  • घायवळ टोळीतील सदस्यांना शस्त्र परवाना

  • एजंट निलेश फाटकने 15 जणांना दिला परवाना

  • बनावट कागदपत्रांद्वारे परवाना दिल्याची धक्कादायक बाब समोर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com