हवामान खात्याचा शेतकऱ्यांना दिलासा! 'या' जिल्ह्यांत पाऊस लावणार हजेरी

हवामान खात्याचा शेतकऱ्यांना दिलासा! 'या' जिल्ह्यांत पाऊस लावणार हजेरी

पावसाअभावी पीक डोळ्यांसमोर करपत असून हातचा खरीप हंगाम वाया गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळकडे लागले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : आधीच उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने ओढ दिल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पावसाअभावी पीक डोळ्यांसमोर करपत असून हातचा खरीप हंगाम वाया गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळकडे लागले आहे. अशात, हवामान खात्यांने गुडन्यूज दिली आहे. पुढील 24 तासांत पाऊस महाराष्ट्रात पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 हवामान खात्याचा शेतकऱ्यांना दिलासा! 'या' जिल्ह्यांत पाऊस लावणार हजेरी
उदय सामंत यांनी मांडला इंडिया आघाडीच्या बैठकीचा खर्च

31 ऑगस्‍ट आणि सप्‍टेंबरमधील आगामी 4 आठवड्यांसाठी हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. यानुसार 24 तासांसाठी पुणे शहराला येलो अलर्ट जारी केला आहे. 31 ऑगस्टला नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर, सप्‍टेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्याच्‍या मध्‍यात मराठवाडा, कोकण यासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाच्‍या चांगल्या पुनरुज्जीवनाची शक्‍यता आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिना उजाडला तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने पीक अक्षरशः कोमेजली आहेत. लाखोंचा खर्च वाया जातो की काय, अशी चिंता सध्या शेतकऱ्यांना सतावतांना दिसून येत आहे. आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. परंतु, हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com