महाराष्ट्र
Weather update | कोयना धरणाचे ६ दरवाजे १ फुटांनी उघडणार
अरविंद जाधव , प्रतिनिधी
राज्यात पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसाने धुवाधार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. सातारामध्ये देखील अशीच परीस्थिती असल्याने आज दुपारी २ वा. कोयना धरणाचे ६ दरवाजे १ फुटांनी उघडणार आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. १०५ टि.एम.सी क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या १०३ टि.एम.सी. एवढा मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. आज दुपारी पायथा व दरवाजे असा एकूण १० हजार क्युसेस विसर्ग नदी पात्रात होणार आहे. या पार्श्वभूमीवर नदी पात्र तसेच पूर रेषेखालील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.