Devendra Fadnavis - Ajit Pawar
Devendra Fadnavis - Ajit Pawar

Devendra Fadnavis - Ajit Pawar : फडणवीस- अजितदादांच्या भेटीतील चर्चेची इनसाईड स्टोरी नेमकी काय?

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Devendra Fadnavis - Ajit Pawar ) राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा आणि 10 हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली ही शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवला आहे.

याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी माणिकराव कोकाटेंचे खाते कुणाला द्यायचे, ते सांगा? असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना थेट प्रश्न विचारल्याची माहिती मिळत आहे. हायकोर्टाने स्थगिती दिली, तरच कोकाटेंचे मंत्रिपद वाचू शकते.न्यायालयाने दिलासा नाही तर कोकाटेंचे मंत्री पद जाणार असल्याची माहिती मिळत असून फडणवीस यांनी वर्षावरील भेटीत अजितदादांना सूचना केल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता या न्यायालयीन निर्णयामुळे कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. कायद्यानुसार, दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधीत्व कायद्यांतर्गत त्यांचे आमदारपद आणि पर्यायाने मंत्रीपद धोक्यात येऊ शकते.माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता वर्तवण्यात आली असून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवताना कोकाटेंचे अटकेचे निर्देश दिले असल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • फडणवीस- अजितदादांच्या भेटीतील इनसाईड बातमी

  • माणिकराव कोकाटेंचे खाते कुणाला द्यायचे, ते सांगा?

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजितदादांना थेट प्रश्न

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com