कन्नड गिते गाताना कोरोना नियम कुठे होते ? मध्यवर्ती एकीकरण समितीचा सवाल
नंदकिशोर गावडे, बेळगाव | महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 1 नोव्हेंबर रोजीच्या मूक सायकल फेरीला परवानगी नाकारण्याच आली आहे. त्यामुळे कन्नड गिते गाताना कोरोना नियम कुठे होते ? असा सवाल मध्यवर्ती एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी उपस्थित केला आहे.
बेळगाव मध्ये 1 नोव्हेंबर काळ्या दिनी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मूक सायकल फेरीला कोरोनाचे कारण पुढे करत परवानगी देण्यात येणार नाही. असे लेखी पत्र उत्तर पोलीस आयुक्तांच्या वतीने मध्यवर्ती एक्कीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना देण्यात आले आहे.
दरम्यान सुवर्णसौधच्या समोर हजारो विध्यार्थींच्या समवेत कन्नड गिते गाण्यात आली तेव्हा कोरोनाचे नियम कुठे होते असा सवाल मध्यवर्ती एक्कीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी उपस्थित केला आहे. त्याचसोबत पोलिसांच्या या दुपट्टी भूमिकेबद्दल सीमाभागात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.