Vijay Kokate : माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे आहेत कुठे ? नाशिक पोलिसांकडून शोध सुरू
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Vijay Kokate) सदनिका गैरव्यवहार प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा आणि 10 हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली ही शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवला आहे.
या न्यायालयीन निर्णयामुळे कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला असून आता या खात्याचा पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार आहे. माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यातच आता माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे हे नेमकं कुठे आहेत अशी चर्चा रंगली असून नाशिक पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. विजय कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकेच्या स्थगितीसाठी अद्याप अर्ज दाखल न केल्याची माहिती मिळत असून माणिकराव कोकाटेंसह बंधू विजय कोकाटेंविरोधात नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे.
Summery
माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे आहेत कुठे ?
नाशिक पोलीसांकडून विजय कोकाटेंचा शोध सुरू
विजय कोकाटेंकडून अटकेच्या स्थगितीसाठी अद्याप अर्ज नाही
