धक्कादायक! कल्याणमध्ये वायफाय राऊटरचा स्फोट; तीन जण जखमी

धक्कादायक! कल्याणमध्ये वायफाय राऊटरचा स्फोट; तीन जण जखमी

कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरातील राम चौधरी चाळीतील एका घरात वायफाय राऊटरचा ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

कल्याण : कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरातील राम चौधरी चाळीतील एका घरात वायफाय राऊटरचा ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कल्याणमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या ब्लाटप्रकरणी केबल चालकाच्या विरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! कल्याणमध्ये वायफाय राऊटरचा स्फोट; तीन जण जखमी
लोकसभेतून अधीर रंजन चौधरींसह 33 विरोधी खासदारांचं निलंबन; कारण काय?

माहितीनुसार, कल्याण पूर्व नवीन गोविंदवाडी परिसरात राम चौधरी चाळीत राहणाऱ्या सायम शेख यांच्या घरात केबल वायफायच्या राऊटरचा ब्लास्ट झाला. या घटनेत सायम यांची दहा वर्षाची मुलगी नाजमीन ही भाजली आहे. तिचा चेहरा आणि दोन्ही हात भाजले आहेत. तिच्यावर खाजगी रुग्णलायात उपचार सुरु आहेत. सायमा यांच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या नगमा अन्सारी ही महिला ८० टक्के भाजली आहे. तर तिचा तीन महिन्याचा लहान मुलगा अरमान हा ५० टक्के भाजला आहे. या दोघांना ऐरोली येथील बर्न रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी केबल चालक राजू म्हात्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केबल चालकाने सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com