Sharad Pawar - Ajit Pawar : जिथे शक्य असेल तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मविआ सोबत घेणार?; आज घोषणा होण्याची शक्यता
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sharad Pawar - Ajit Pawar ) आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन केलं जाताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अजित पवार यांना घेण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिथे जिथे शक्य होईल तिथे अजित पवार यांना महाविकास आघाडी सोबत घेणार असल्याची माहिती मिळत असून याबाबतची घोषणा आज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारी रोजी चिन्हाचं वाटप होणार आहे.
