MVA - MNS Morcha : उद्याच्या मोर्चाबाबत काँग्रेसचा सावध पवित्रा?; मोर्चात हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार का?
थोडक्यात
- 1 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता महाविकास आघाडीकडून मोर्चा काढण्यात येणार 
- विरोधकांच्या उद्याच्या मोर्चाबाबत काँग्रेसचा सावध पवित्रा 
- उद्या मोर्चात हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार का याकडे नजरा 
(MVA - MNS Morcha) 1 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता महाविकास आघाडीकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. मतदार याद्यांमधील घोळ याचा निषेध करण्यासाठी 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
मात्र या मोर्चाबाबत बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा सावध पवित्रा असलेला पाहायला मिळतो आहे. बिहार निवडणुकीमुळे काँग्रेसने महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चात सावध पवित्रा घेतला असल्याची चर्चा सुरू आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहिले नाहीत. मात्र आता उद्याच्या मोर्चाला हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

