Manikrao Kokate
Manikrao Kokate

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद जाणार? सदनिका गैरव्यवहार प्रकरणी सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Manikrao Kokate) राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा आणि 10 हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आली आहे.

प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली ही शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या न्यायालयीन निर्णयामुळे कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे.

कायद्यानुसार, दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधीत्व कायद्यांतर्गत त्यांचे आमदारपद आणि पर्यायाने मंत्रीपद धोक्यात येऊ शकते. या निकालानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

Summery

  • मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत

  • सदनिका प्रकरणात सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

  • दोन वर्षे कारावास आणि 10 हजार दंडाची शिक्षा कायम

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com