Nawab Malik : नवाब मलिक विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार; कोणत्या गटासोबत बसणार?

Nawab Malik : नवाब मलिक विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार; कोणत्या गटासोबत बसणार?

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. नवाब मलिक वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत आणि आज नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. 11 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं मलिकांना मोठा दिलासा देत, वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. नवाब मलिक आज विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहे.

अधिवेशनात मलिक हे अजित पवार गटाच्या आमदारांसोबत बसतात, की शरद पवार गटाच्या आमदारांसोबत बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक अजित पवार गटासोबत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र नवाब मलिक यांनी याबद्दल काही प्रतिक्रिया दिली नाही आहे.

आजपासून पुढचे 10 दिवस नागपूरात हे हिवाळी अधिवेशन सुरु असणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. काल चहापानाचा कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमावार विरोधकांनी बहिष्कार टाकला. यावर पत्रकार परिषदेतून विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला हवं. असे म्हणत फडणवीसांनी जोरदार टोला लगावला. त्यामुळे आता विरोधकांच्या प्रश्नांना सत्ताधारी कसं उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णय घेतला जाणार का? किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com