Winter Session : 8 डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता
थोडक्यात
8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार
8 डिसेंबरपासून सुरू होणार हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता
पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले संकेत
(Winter Session) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र ते 10 दिवस पुढे ढकललं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ही शक्यता व्यक्त केली असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
अजून तरी सरकारकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे. मात्र आता 8 डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता असून याबाबत काही अधिकृत घोषणा करण्यात येत का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
