पीएफ खातेधारकांसाठी मोठी बातमी! थेट ATMमधून काढता येणार पैसे

पीएफ खातेधारकांसाठी मोठी बातमी! थेट ATMमधून काढता येणार पैसे

पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! 2025 पासून थेट एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार, कामगार मंत्रालयाने केली घोषणा.
Published by :
shweta walge
Published on

नोकरदारांसाठी सरकारकडून एक आनंदाची बातमी आहे. पीएफ (प्रोव्हिडंट फंड) खातेधारकांना आता त्यांचे पीएफचे पैसे थेट एटीएममधून काढता येणार आहेत. या नव्या सुविधेचा लाभ पीएफ खातेधारकांना जानेवारी २०२५ पासून मिळणार आहे. कामगार मंत्रालयाने या निर्णयाची घोषणा केली असून, यामुळे नोकरदारांना त्यांच्या पीएफवर जास्त सोय आणि सुविधा मिळतील.

कामगार सचिव सुमिता डावरा यांनी बुधवारी या नव्या सुविधेबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, 2025 पासून कर्मचाऱ्यांना थेट एटीएममधून पीएफचे पैसे काढण्याची सुविधा मिळेल. म्हणजेच अवघ्या एक महिन्यानंतर कर्मचाऱ्यांना आपला भविष्य निर्वाह निधी थेट एटीएममधून काढता येणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा देशातील 7 लाख लोकांना फायदा होणार आहे.

EPFO ​​सदस्यांना सोप्या आणि जलद सेवा देण्यासाठी कामगार मंत्रालय आपली IT प्रणाली सतत अपडेट करत आहे. या बदलामुळे भविष्य निर्वाह निधी खातेधारकांना त्यांच्या पीएफ रकमेपर्यंत सहज प्रवेश मिळेल. आता ते थेट एटीएममधून हक्काचे पैसे काढू शकतील. यामुळे केवळ प्रक्रिया सुलभ होणार नाही तर मानवी हस्तक्षेपही कमी होईल.

जर कर्मचाऱ्यांना EPFO ​​अंतर्गत आंशिक पैसे काढायचे असतील तर त्यांना त्यासाठी अर्ज करावा लागेल. सध्या पीएफचे पैसे काही विशिष्ट परिस्थितीतच काढता येतात. कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेसाठी EPFO ​​वेबसाइट किंवा उमंग ॲपद्वारे दावा दाखल करावा लागेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com