महाराष्ट्र
सेल्फीच्या नादात महिला पडली नदीत, पुढे 'हे' झालं...
पावसाळ्यात पर्यटनस्थळ आणि धोकादायक पद्धतीने वाहणाऱ्या नद्याजवळ सेल्फीचा मोह अनेकांना आवरत नाही
प्रवीण बाबरे, पालघर: पावसाळ्यात पर्यटनस्थळ आणि धोकादायक पद्धतीने वाहणाऱ्या नद्याजवळ सेल्फीचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र हाच सेल्फीचा मोह अनेकांच्या जीवावरही बेतला आहे. अशीच एक घटना पालघर येथील भीम बांध येथे घडली आहे.
रविवार 30 जुलै रोजी डहाणूतील सूर्या नदीवरील वाघाडी येथील भीम बांध येथे ही असाच प्रकार घडला आहे. सुदैवाने येथे असलेल्या डहाणू पंचायत समितीच्या उपसभापतीने, वेळीच नदीत उडी मारून नदीच्या प्रवाहात पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढले.
पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुर्या नदीला मोठा पूर आला असून, डहाणूतील एक दांपत्य हे वाघाडीतील भीम बांध येथे पर्यटनासाठी आलं होते. मात्र महिला सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरुन ती नदीत कोसळली. यानंतर पिंटू गहला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नदीत उड्या टाकत या महिलेला सुखरूप बाहेर काढलं .