मुंबईत महिलेवर भोंदूबाबांकडून बलात्कार

मुंबईत महिलेवर भोंदूबाबांकडून बलात्कार

Published by :
Published on

सिद्ध तांत्रिकाबरोबर भेटीचे प्रलोभन दाखवून एका महिलेवर बलात्कार करून तिची लुबाडणूक केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी कांदिवलीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन भोंदूबाबांना अटक केले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका येथे देखील बलात्काराची घटना घडली होती. त्या घटनेतदेखील महीला त्या आरोपीला पुर्वी पासून ओळखत असल्याचे समोर आले. त्याने राग आणि सुड घेण्याच्या भावनेतुन हे क्रूत्य केले. त्या घटनेचा निकाल नाही लागला तर मुंबईत आणखी एक घटना समोर आली आहे.

कांदिवलीमध्ये राहणारी ३४ वर्षीय पीडित महिला घरगुती समस्या सोडवण्यासाठी गुजरातमधील एका पुजाऱ्याला भेटण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी तिची ओळख गौतम गिरी याच्याशी झाली. जो पुजाऱ्यासाठी काम करतो. २०१८ ते २०२० पर्यंत त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. नंतर महिलेकडून लाखो रुपये उकळले. मुख्य पुजारी प्रणव शुक्ला यानेही महिलेचे शारीरिक शोषण केले. अखेरीस दोन्ही भोंदूबाबांना अटक करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com