Ravindra Chavan
Ravindra Chavan

Ravindra Chavan : 'शेवटचे 15 दिवस कार्यकर्त्यांनी 16 तास काम करा'; रविंद्र चव्हाण यांच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ravindra Chavan) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते.

काल 31 डिसेंबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. आज 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना सूचना दिल्याचे पाहायला मिळत आहे.

'शेवटचे 15 दिवस कार्यकर्त्यांनी 16 तास काम करा'असे रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. 'भाजप जिंकण्याचा अंदाज असला तरी काम करावं' असे उल्हासनगरमध्ये रविंद्र चव्हाण हे कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

Summary

  • 'शेवटचे 15 दिवस कार्यकर्त्यांनी 16 तास काम करा'

  • रवींद्र चव्हाण यांच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना

  • 'भाजप जिंकण्याचा अंदाज असला तरी काम करावं'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com