Kolhapur : कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडलं; कलाविष्कार सादर करत कलाकार करणार निषेध आंदोलन
थोडक्यात
कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडलं
कलाविष्कार सादर करत कलाकार करणार निषेध आंदोलन
रंगभूमी दिनापासून नाट्यगृहात एक तास कलाविष्कार सांदर करत निषेध आंदोलन करण्याचा निर्णय
(Kolhapur) कोल्हापूरच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बाधणीबाबत विलंब होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बाधणीबाबत विलंब होत असल्याच्या निषेधार्थ स्थानिक कलाकार आंदोलन करणार आहेत.
बुधवारी चार नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनापासून नाट्यगृहात एक तास कलाविष्कार सांदर करत निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. याविषयी अनेक बैठका घेऊन क्राम सुरू नाही. 
31 ऑक्टोबरपर्यंत छताचे काम करण्याची मुदत दिली होती मात्र अद्याप हे काम पूर्ण का झाले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
