World vada pav Day ! झणझणीत वडा पाव आणि मुंबईकर…
मुंबईतील सर्वोत्तम वडा पाव खाण्याची इच्छा कोणाला नसेल असं शक्य नाही. शेवटी हे तळलेले सौंदर्य मुंबईचे आवडते फास्ट फूड मानले जाते. मसाल्यांसह फ्लफी पावमध्ये गुंडाळलेले वडा पाव हे विशेषतः पावसाळ्यात गरम खाताना चांगले अनुभवले जाते. हे इतके लोकप्रिय आहे की या उत्कृष्ट फराळाचा स्वतःचा दिवस देखील आहे, तो म्हणजे जागतिक वडा पाव दिवस 23 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. याच मुंबईत मिळणारे काही खास वडापाव जे तुम्ही एकदा आवर्जून स्वाद घ्यायला हवा.
आराम वडापाव – विशेष: बटाट्याची पांढरी भाजी
कुठे: आराम उपहारगृह (स्थापना १९३९), मुंबई सीएसटी स्टेशनसमोर
गजानन वडापाव ( स्थापना १९७८) – विशेष: पिवळ्या रंगाची चटणी
कुठे: भगवती शाळेजवळ, विष्णू नगर, ठाणे
अशोक वडापाव किंवा किर्ती कॉलेज वडापाव (१९८३ पासून) – विशेष: चटणी आणि वडापावबरोबर दिला जाणार चुरा
कुठे: किर्ती कॉलेजजवळ, दादर (पूर्व)
आनंद वडापाव – विशेष: मेयो वडापाव, चीझ वडापाव
कुठे: मिठीभाई कॉलेज जवळ, विलेपार्ले (पश्चिम)
मसाला वडापाव – विशेष: पावाला लावण्यात येणारा मसाला
कुठे: कालिदास नाट्यगृहाजवळ, मुलुंड (पश्चिम)
भाऊचा वडापाव – विशेष: आलं आणि नारळाची चटणी
कुठे: पाटील भवन, एन. एस. रोड, स्टेशन रोड मुलुंड (पश्चिम)
जगदीश बुक डेपोजवळचा वडापाव – विशेष: वड्याचा कुरकुरीतपणा
कुठे: जगदीश बुक डेपोच्या बाजूला, अलोक हॉटेलच्या पुढे, ठाणे (पश्चिम)
शिवाजी नगरचा वडापाव – विशेष: नारळ-शेंगदाणा चटणी, लसूण चटणी आणि ठेचा
कुठे: गजानन महाराज मंदीर रोड, शिवाजी नगर, ठाणे (पश्चिम)
आशा पारेख रुग्णालयासमोरील वडापाव – विशेष: आलं, पुदीना आणि पिवळी चटणी (येथे भजीही उत्तम मिळतात)
कुठे: आशा पारेख रुग्णालयासमोर, सांताक्रुज (पश्चिम)
ठाकूर वडापाव, डोंबिवली – विशेष: मक्याचा चिवडा, कांदा आणि कोबी
कुठे: आदित्य हॉलच्या समोर, आगरकर रोड, डोंबिवली (पूर्व)
मंगेश वडापाव (बोरिवली) – विशेष: वड्याचा कुरकुरीतपणा (येथील सामोसाही उत्तम आहे)
कुठे: लक्ष्मी भूवन, ठाकूर शॉपिंग मॉलच्यासमोर, बोरिवली (पश्चिम)
पार्लेश्वर वडापाव (समर्थ वडापाव) -विशेष: हिरवी चटणी (येथील सामोसा तसेच भजीपाव उत्तम आहे)
कुठे: प्रेम शॉपिंग सेंटर, नेहरु रोड, नौपाडा, विलेपार्ले (पश्चिम)
अशोक साटम वडापाव (सीटीओ वडापाव) – विशेष: कोथिंबीर, कडीपत्ता आणि आल्याच्या मिश्रणात तळलेले मिरची
कुठे: महात्मा गांधी रोड, सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसजवळ, आझाद मैदान, फोर्ट परिसर (मुंबई)
एलफिस्टन रोड स्टेशनचा वडापाव – विशेष: पुदिना आणि चिंचेची चटणी
कुठे: एलफिस्टन रोड रेल्वे स्टेशनबाहेर, मुंबई
ग्रज्युएट वडापाव, भायखळा – विशेष: वेगवेगळ्या प्रकराच्या चटणी
कुठे: भायखळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर, भायखळा (पश्चिम)
मग काय तुम्ही यापैकी किती वडापाव खाल्ले आहेत आणि अजून किती ट्राय करायचे राहिलेत?