शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा आरोप; यशोमती ठाकूर यांनी राणा दांपत्यावर केली जळजळीत टीका

शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा आरोप; यशोमती ठाकूर यांनी राणा दांपत्यावर केली जळजळीत टीका

Published by :

सुरज दहाट, अमरावती | अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा Chatrapati Shivaji Maharaj Statue हटवण्यावरून राजकारण तापले आहे. आमदार रवी राणा Ravi Rana व खासदार नवनीत राणा Navneet Rana अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांच्यावर टीका करत आहेत.यात आता प्रथमच या मुद्दयावर भाष्य करत यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांनी राणा दांपत्याला प्रतिउत्तर दिले आहे. नागरीकांचे प्रतिनिधित्व करणारी मंडळी चुकीच्या पद्धतीने त्या ठीकाणी पोहोचली असल्याची टीका यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांनी नाव न घेता केली. यावेळी नवनीत राणा Navneet Rana यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्यावर डिवचण्याचा यशोमती ठाकूर यांनी प्रयत्न केला.

रवी राणा Ravi Rana यांनी विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा Chatrapati Shivaji Maharaj Statue उभारल्यानं या पुतळ्यावर पोलिसांनी कारवाई करत हा पुतळा हटवला होता. त्यानंतर बराच वेळ नवनीत राणा Navneet Rana आणि रवी राणा Ravi Rana यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. या घटनेनंतर जिल्हयातील राजकारण तापले होते. राणा दांपत्य विरूद्ध यशोमती ठाकूर Yashomati Thakur असा संघर्ष सूरू झाला होता.

शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांनी अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधत आमदार रवी राणा Ravi Rana व खासदार नवनीत राणा Navneet Rana यांच्यावर सडकून टीका केली. अमरावती जिल्ह्यात संविधानाचा सन्मान होत नाही,कारण वारंवार कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांनी सांगितले.

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला परवानगी न घेता पुतळा बसवला त्यामुळे नियमाचे पालन न केल्याने ही कारवाई केल्या गेली त्यामुळे प्रशासनाने केलेली पुतळा हटवल्याची कारवाई योग्यच असल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकुर Yashomati Thakur यांनी दिली. राणा दांपत्याचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. नागरीकांचे प्रतिनिधित्व करणारी मंडळी चुकीच्या पद्धतीने त्या ठीकाणी पोहोचली असल्याची टीका यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांनी नाव न घेता केली. अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले होते. हे प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणावर बोलून त्यांनी नवनीत राणा Navneet Rana यांना डिवचले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com