लाइटर परत मागितल्यामुळे तरुणाला बेदम मारहाण; घाटकोपर येथील धक्कादायक घटना
रिद्धेश हतिम, मुंबई; मुंबईच्या घाटकोपर येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंथ नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिगरेट पेटवण्याकरता एका तरुणाकडून लाइटर घेतले मात्र त्या तरुणाने लाईटर परत मागितल्यामुळे चौघांकडून त्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेनंतर पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिसांनी चार आरोपींना अटक केले आहे. अटक आरोपीचे नाव 1) जतीन संजय सिंग 28 वर्षे 2) विशाल गौतम जाधव 27 वर्षे 3) दत्ता कांबळे उर्फ मालटा 22 वर्षे 4) महेंद्र मुकेश सिंग 21 वर्षे असून चारही सराईत गुन्हेगार दरम्यान त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते आणि न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रात्रीच्या वेळी घरी जात असताना शताब्दी क्रीडा मंडळ, गौसिया मस्जिद जवळील मैदानाच्या कोपऱ्यावर उभ्या असलेल्या जतीन, मालटो, विशाल, महेंद्र यांनी फिर्यादी कडून सिगारेट पेटवण्यासाठी लाइटर मागितले. त्या चौघांची सिगरेट पेटवून झाल्यानंतर फिर्यादीने लाइटर परत मागितले. मात्र मद्यपानाच्या नशेत असल्यामुळे लाइटर परत मागितल्यामुळे त्यांना त्याचा राग आला आणि रागात त्यांनी फिर्यादीला शिव्या गाळ करत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली व फिर्यादीला गंभीर जखमी केला. या घटनेनंतर परिसरातील काही स्थानिक रहिवासांनी फिर्यादीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले व रुग्णालयाने फिर्यादी यांच्या घरच्यांना संपूर्ण घटना बदल कळवले त्यानंतर फिर्यादी यांच्या घरच्यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संपूर्ण घटनेचा गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिसांनी चौघांना अटक केले या चौघांना 22 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सोनवण्यात आली आहे