एक्सप्रेसमध्ये बाळ ठेवून तरूणींचा पळ;घटना सीसीटीव्हीत कैद

एक्सप्रेसमध्ये बाळ ठेवून तरूणींचा पळ;घटना सीसीटीव्हीत कैद

Published by :
Published on

विकास माने, बीड | बीडच्या परळी रेल्वे स्थानकावर उभ्या असणाऱ्या एक्सप्रेसमध्ये दोन तरूणींनी बाळ ठेवून पळ काढल्याची घटना घडली. या दोन्ही तरुणीचा शोध सध्या रेल्वे पोलीस करत आहेत.

नांदेड बेंगलोर एक्सप्रेसमध्ये दोन तरुणींनी एक ते दीड महिन्याचं बाळ ठेवल्याची घटना समोर आलीय. या दोन्ही तरुणीचा शोध सध्या रेल्वे पोलीस करत आहेत. सदरील बाळ पुरुष जातीचं असून सध्या अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही तरुणी विरोधात परळी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून तरुणींचा शोध घेतला जातोय

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com