नागपूरचा तरुण प्रेयसीला भेटायला आला अन् घडलं भयानक
उदय चक्रधर | भंडारा : एका तरुणीसोबत लॉजमध्ये गेलेल्या तरुणाचा अचानक मृत्यू झाला. ही घटना भंडारा शहरातील हिरणवार लॉजमध्ये घडली आहे. या घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. क्रिष्णा रायभान धनजोडे (वय २३, रा. नागपूर) असे मृताचे नाव आहे.
माहितीनुसार, क्रिष्णाचे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील जरफडा येथील एका २३ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. २० ऑगस्ट रोजी हे दोघेही भेटण्याकरिता भंडाऱ्याला आले. पर्यटन स्थळे फिरून शहरात सामान खरेदी करून त्यांनी जेवण केले. त्यानंतर शहरातील हिरणवार लॉज येथे मुक्कामी थांबले. तरुणाने शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या होत्या.
रात्री दोघेही झोपी गेले पण मध्यरात्री तरुणी झोपेतून उठली असता तिने क्रिष्णाला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने काहीच हालचाल केली नाही. यामुले मुलगी घाबरली व लॉजमधील कर्मचाऱ्यांना आवाज दिला. व सर्वांनी मिळून भंडारा येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, त्याआधीच क्रिष्णाचा मृत्यू झाला होता.