bee attack
bee attack

मधमाश्यांच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू, 10 जण गंभीर जखमी

या घटनेत अन्य 10 जण जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published by :
Published on

प्रशांत जगताप, सातारा | साताऱ्यात शिवाजीनगर येथे डोंगरावर गेलेल्या मुलांवर आगी मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये पाटण तालुक्यातील तारळे येथील एक 13 वर्षाचा सोमेश्वर विलास कदम हा मुलगा डोंगराच्या कड्यावरून खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे.या घटनेत अन्य 10 जण जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत..

मधमाशांच्या हल्ल्याची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थ आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलाला दरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र आगी महू आक्रमक असल्याने मुलास बाहेर काढण्यास अडथळा येत होता.. रेस्क्यू टीमच्या जवानांनी पीपीई किट घालून त्यास दरीतून बाहेर काढले मात्र त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

सोमेश्वर विलास कदम हा मामाच्या गावाला आला होता. डोंगरावर गुराख्याबरोबर गुरे चरायला गेला असताना त्याच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे तो डोंगराच्या कड्यावरून खाली कोसळला त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य 10 जण जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत..

जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे

गौरव लावंघरे (16)

जय लावंघरे (14)

तानाजी धनवडे (72)

स्वरुप धनवडे(19)

प्रणय धनवडे (24)

संदेश धनवडे (22)

राजेश पवार (45)

शुभम धनवडे (24)

गणेश बाकले (25)

ऋषी धनवडे (25)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com