Chhatrapati Sambhajinagar
महाराष्ट्र
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव महामार्गावर तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव महामार्गावर तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. जळगाव महामार्गावरील फुलंब्री-सिल्लोड रस्त्यावर हुल्लडबाजी करत वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आला.
बैलगाडी आणि दुचाकी रस्त्यात आणून तरुणांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. तरुणांच्या रात्रीच्या या गोंधळामुळे महामार्गावर अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हुल्लडबाज करणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.
Summary
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी
जळगाव महामार्गावरील फुलंब्री-सिल्लोड रस्त्यावर रस्त्यात हुल्लडबाजी करत वाहतुकीस अडथळा
बैलगाडी आणि दुचाक्या रस्त्यात आणून तरुणांचा गोंधळ
