संभाजीराजेंचे नक्षलवाद्यांना पत्र… मराठा आंदोलनाचे नवे समीकरण?
मराठा समाजाला साद घालण्यासाठी नक्षलवाद्यांनी कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना हाताशी घेऊन नक्षलवादी लढा मजबूत करण्याचा मानस नक्षलवाद्यांचा आहे. त्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी नक्षलवाद्यांनाच पत्र लिहिले आहे.
नक्षलवाद्यांनो आम्हीच तुमची वाट पाहात आहोत. मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन संभाजीराजेंनी केलंय. संभाजीराजेंच्या आवाहनानंतर नक्षलवाद्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिल्यास राज्यात नवे समीकरण उदयाला येऊ शकते. तसेच नक्षलवादी संघटनांमधील तरुण या आवाहनानंतर मुख्य प्रवाहात आल्यास याचं श्रेय देखील संभाजीराजेंना जाऊ शकतं.
काय म्हणाले संभाजीराजे?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे मला वाचनात आले. 'मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत' असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. "नक्षलवाद्यांनो या… आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात." भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे, असे छत्रपतींनी पत्र लिहिले आहे.