Zero Shadow Day : विदर्भात उद्या शून्य सावलीचा दिवस; खगोलप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
कधीही साथ न सोडणारी आपलीच सावली आपल्याला यंदा शनिवारी काही काळासाठी सोडुन जाणार आहे अर्थात शुन्य सावली दिवस आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. शुन्य सावली दिवस मुळात ही संकल्पनाच किती चकित करणारी आहे. वर्षभर आपल्या सोबत असणारी आपली सावली या दिवशी मात्र काही काळासाठी आपल्यापासून दूर निघुन जाते ही अनुभुती आपल्याला या शुन्य सावली दिवसाच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
शून्य सावली म्हणजे काय ?
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३. ५० अंश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भागावर सूर्य वर्षातुन दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात.ही वर्षातूनं दोनदा घडणारी एक अद्वितीय भौगोलिक घटना आहे. महाराष्ट्रामध्ये ३ मे ते ३१ मे पर्यंत शुन्य सावली दिवस येतात .
विदर्भात कधी असणार शून्य सावली ?
मात्र विदर्भांतील नागरिकांना १७ ते १९ मे या दरम्यान विविध शहरात वेगवेगळ्या दिवशी या क्षणाचा अनुभव घेता येणार आहे. त्यासाठी उद्या दुपारी साधारण १२ ते १२. ३५ च्या दरम्यान मोकळ्या जागी किव्हा घराच्या गच्चीवर किव्हा अंगणात सुर्य निरीक्षण केल्यास शुन्य सावलीचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे .याकरिता कोणतीही उभी वस्तू उन्हात ठेवल्यास त्याची सावली आपल्याला दिसणार नाही.
विदर्भांमध्ये चंद्रपुर, वाशीम, पांढरकवडा, लोणार या ठिकाणी उद्या हा अनुभव घेता येणार आहे. खगोलप्रेमी मात्र या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतात . त्यामुळे खगोलप्रेमींमध्ये याबाबत खूप उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.