Zilla Parishad Election
महाराष्ट्र
Zilla Parishad Election : जिल्हा परिषद निवडणुकांची 2 आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता
महापालिका निवडणुकाही 30 जानेवारी पर्यंत होणार असल्याची माहिती आहे.
थोडक्यात
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यात घोषणा करण्याची शक्यता
30 दिवसातच पार पाडणार निवडणुका
महापालिका निवडणुकाही 30 जानेवारी पर्यंत उरकणार
(Zilla Parishad Election ) निवडणुकांचा बिगुल वाजलं असून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांसाठी चांगलंच तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यात घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुका जाहीर होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्या पूर्ण करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. 30 दिवसांतच या निवडणुका उरकणार असल्याची माहिती मिळत आहे.
