Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता; निवडणुकांसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Election) जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याविषयीचा अर्ज दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत संपवा, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यातच 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकण्याची विनंती करणारा अर्ज आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे. आज या अर्जावर सुनावणी होणार असून काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लांबणीवर
राज्य निवडणूक आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात अर्ज
'निवडणुकांसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी'
