Nashik Tapovan
Nashik Tapovan

Nashik Tapovan : हैदराबादवरून नाशिकसाठी 15 हजार झाडं येणार; आज दुपारपर्यंत झाडं नाशकात दाखल होणार असल्याची माहिती

नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nashik Tapovan ) नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध होत आहे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवनमध्ये साधुग्राम बांधण्याची योजना आहे.

या साधुग्रामसाठी तपोवनमधील जवळपास 1800 झाडं तोडावी लागणार आहेत. पर्यावरणप्रेमींचा या वृक्षतोडीला विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर आता तपोवनातील प्रस्तावित वृक्ष तोडीला विरोध आहे तर दुसरीकडे हैदराबादच्या राजमुंद्री येथून झाडे मागविण्यात आली आहेत.

ही झाडे आज दुपारच्या सुमारास दाखल होणार असल्याची माहिती मिळत असून शहरात वेगवेगळे ठिकाणी नवीन 15 फुटांचे 15 हजार झाडं लावण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती. हैदराबाद येथील राजमुद्री येथून ही झाडे मागविण्यात आली आहेत.

Summery

  • हैदराबादवरून नाशिकसाठी 15 हजार झाडं येणार

  • आज दुपारपर्यंत झाडं नाशकात दाखल होणार असल्याची माहिती

  • 15 फुटांची 15 हजार झाडं लावण्यात येणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com