Heart Attack
नाशिक
Heart Attack : Nashik : सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
ह्दयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे.
(Heart Attack) ह्दयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना तिला चक्कर आली.
शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. या मुलीला हृदयाशी संबंधित आजार असल्याची माहिती मिळत आहे.