Nashik : रावसाहेब दानवेंच्या नातवावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
थोडक्यात
रावसाहेब दानवेंच्या नातवावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा दाखल
नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
(Nashik ) रावसाहेब दानवेंच्या नातवावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातू शिवम पाटील सह आठ जणांवर नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करून त्याबद्दल देण्यात येणाऱ्या रकमेपैकी दहा कोटी रुपये न देत फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपाचेच पदाधिकारी आणि उद्योजक असलेले कैलास आहेर यांनी गुन्हा दाखल केला असून कंपनी मालक कैलास अहिरे यांनी त्यांच्या कंपनीत रावसाहेब दानवे यांचे नातू आणि इतर काही जणांना भागीदारी दिली होती.
भागीदारी देऊन देखील मला माझे पैसे मिळाले नाहीत, 14% कंपनीचे शेअर्स रावसाहेब दानवे यांच्यात सांगण्यावरून मी दिले होते 14% शेअर्स बदल्यात 25 कोटी रुपये देण्याचा व्यवहार ठरला असल्याचे कंपनीचे मालक कैलास अहिरे यांनी सांगितले.
