Bala Darade On Rahul Gandhi : "मविआ गेली खड्ड्यात..." राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावरुन दरडेंचा पारा चढला
आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बाळा दराडे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींना नाशिकमध्ये न येण्याचा इशारा दिला आहे. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलेलं खपवून घेणार नाही असं म्हणत, राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळ फासून गाडीवर दगडफेक करू असं म्हणत बाळा दराडेंनी थेट हल्ला केला आहे.
बाळा दराडे शिवसेना ठाकरे गटाचे उप महानगर प्रमुख आहेत. त्यांनी राहुल गांधींना दिलेल्या या इशाऱ्यामुळे मविआमध्ये मीठाचा खडा पडला आहे. यावेळी बाळा दराडे म्हणाले की, " सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही. महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, सावरकर आणि हिंदुत्व पहिले. राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळं फासू आणि त्यांच्या गाडीवर दगडफेक करु" असं बाळा दराडे म्हणाले आहे. त्यामुळे मविआमध्ये पुन्हा घुसफूस पाहायला मिळत आहे.