Nashik : अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील नदीला पूर; एक युवक दुचाकीसह गेला वाहून, संपूर्ण थरार कॅमेऱ्यात झाला कैद VIDEO
थोडक्यात
अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील गलाठी नदीला पूर
पुराचं पाणी शिरलं गावात, एक युवक दुचाकीसह गेला वाहून
संपूर्ण थरार कॅमेऱ्यात झाला कैद
(Nashik ) राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागात मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत असून नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील मध्यरात्री गलाठी नदीला मोठा पूर येऊन ते पाणी थेट गावात घुसल्याने गावकऱ्यांची एकच धावपळ उडाली.
एक युवक संदीप बंडू खैरनार, वय वर्षे 22 हा त्याच्या दुचाकीवरून जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो दुचाकीसह वाहून गेला. सुदैवाने त्याला एका झाडाचा आधार मिळाला आणि तो जवळपास दोन तास त्या झाडावर होता.
गावच्या सरपंचांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाला कॉल करून बोलावले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले आणि त्या तरुणाला वाचविले.
