Nashik : नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्याचा वावर; भीतीचे वातावरण, मात्र ट्रॅप कॅमेरात आढळून आलं वेगळच सत्य...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik ) काही महिन्यांपासून शहरात बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भोसला शाळेच्या आवारात बिबट्या दिसल्याने धावपळ उडाली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळेला सुट्टी देण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर भोसला मिलिटरी शाळेला आजदेखील सुट्टी देण्यात आली. बिबट्याचा या परिसरात वावर असल्याचे समोर आल्याने सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. त्यानंतर या परिसरात ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला.
या ट्रॅप कॅमेरात भोसला मिलिटरी स्कुल परिसरात असलेला बिबट्या नसून ते रानमांजर असल्याचे समोर आले आहे. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरात मात्र रान मांजर आढळून आल्याने यंत्रणांकडून आत रान मांजराचा शोध सुरू झाला आहे.
Summery
नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल परिसरात असलेला बिबट्या नाही तर रानमांजर.
ट्रॅप कॅमेरात आढळून आले रानमांजर
आज देखील शाळेला सुट्टी जाहीर
